मोसंबीच्या बागेमधून गांजा जप्त ; एक ताब्यात


। अहमदनगर । दि.09 जुलै 2023 ।  शेवगांव तालुक्यातील आखतवाडे शिवारातील बोर लगण वस्ती येथील मोसंबीच्या बागेतून सोडपाच लाख रुपये किंमतीचा 113 किलो गांजा पकडला आहे. ही कारवाई शनिवारी दि.8 रोजी सायंकाळच्या दरम्यान शेवगांव पोलिसांनी केली आहे.

माहितीच्या आधारावर तालुक्यातील आखतवाडे शिवारात गट नंतर 156 मध्ये गांजाची झाडे असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी पथकाची नियुक्ती करुन या कारवाईबाबत तहसीलदार राहुल गुरव, वजन मापे निरीक्षक अनुप कुलकर्णी यांना कळविले, तसेच दोन पंच छायाचित्रकारासह मोसंबीच्या शेतीमध्ये छापा टाकला.

यावेळी अरुण बाजीराव आठरे यांच्याकडे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी चौकशी केली असता त्याने गांजाची झाडे लावल्याची कबुली दिली. गांजाच्या झाडांची मोजदाद व वजन करुन ती ताब्यात घेण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी नाकाडे यांनी फिर्याद दिली असून अरुण आठरे यास त्याब्यात घेतले आहे. ही कारवाई वरिष्ठाच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक विश्वास बी.पावरा, आशिष प.शेळकेांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post