। अहमदनगर । दि.03 जून । केडगाव ते अरणगाव बायपास मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाकरीता या मार्गावरील वाहतुकीत तसेच राष्ट्रीय महामार्ग ५६१ अ वाळुंज बायपास ते मुठ्ठी चौक दरम्यान रस्ता रुंदीकरण तसेच एमआयआरसी गेट नं. ४ व रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वाळुंज बायपास ते मुठ्ठी चौक दरम्यान अवजड वाहतुकीसाठी दोन महिन्यांकरिता बदल करण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे.
कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणारा सराईत गुन्हेगार पकडला
केडगाव बायपासकडून येणारी वाहने बायपासमार्गेच सरळ अरणगाव बायपासमार्गे सुरु राहील. सोलापुरकडून येणारी वाहतुक अरणगाव बायपास- कायनेटिक चौक-केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येणार आहे. सोलापुरकडून येणारी मोठमोठी अवजड वाहने (जी वाहने कायनेटीक चौक येथून वळविणे शक्य नाहीत अशी ट्रेलर अरणगाव बायपास-केडगाव बायपास मार्गेच सुरु राहतील. वाळुंज बायपास ते मुट्ठी चौक या मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.
भंडारदरा मधील पांजरे गावात ३ व ४ जून रोजी काजवा महोत्सव
याबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अहमदनगर येथे समक्ष येथुन किंवा pi.tfccity.anr@mahapolice.gov.in वर ७ जुन, २०२३ पर्यंत देण्यात याव्यात, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Tags:
Breaking
