नेप्ती शिवारातील गावठी हातभट्टी दारुधंदे उध्वस्त


। अहमदनगर । दि.7 मे 2023 । नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत नेप्ती गावचे शिवारात विनापरवाना बेकायदेशीररित्या सुरु असलेले अवैध धंद्यांवर छापे टाकून पोलिसांनी दारु धंदे उध्वस्त केले. या कारवाईत पोलिसांनी 88 हजार रुपये किमतीचे 1 हजार 100 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन  व 5 हजार रुपये किमतीची 50 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जागीच नष्ट केली.  

महिलेच्या पर्स मधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी 

या बाबतची माहिती अशी की नगर तालुका पोलिसांनी नेप्ती शिवारातील अवैध धंद्यांवर, गावठी हातभट्टीच्या अड्यांवर, छापे टाकले या कारवाई दरम्यान तीन गावठी हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्यात आले असून या कारवाई मध्ये 88 हजार रुपये किमतीचे 1हजार 100 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन  व 5 हजार रुपये किमतीची 50 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु असा एकूण 93 हजार किमतीचा प्रोव्हिशन गुन्ह्याचा मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला. व सदर रसायनाची प्लॅस्टिक टिपाड व बॅरल व ड्रम जागीच नाश करण्यात आले.  

शटडाऊनमुळे एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा 

या कारवाईत नगर तालुका पोलिसांनी हातभट्टी चालक महेश अनिल पवार, विशाल मनोहर पवार, दिलीप नाथू पवार ( वय 62 वर्षे सर्व राहणार नेप्ती तालुका जिल्हा अ.नगर) यांना ताब्यात घेतले आहे. तिघांविरूद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

कामगारदिनी महावितरणच्या ६९ यंत्रचालक व तंत्रज्ञांचा गौरव 

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोस्टचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रंजीत मारग, पोलिस अंमलदार- विक्रांत भालसिंग, कमलेश पाथरुट, जयदत्त बांगर,चालक विकास शिंदे, महिला पोलीस नाईक फुंदे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post