। अहमदनगर । दि.05 एप्रिल । नागापूर कमानीत अंजली वॉशींग सेंटरजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांची कारवाई करून दोन लाख 76 हजार 580 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दीपक निळकंठ घाटे (वय 40 रा. नागापुर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
राजेंद्र ससे दुर्लक्षितांना मदतीचा हात देणारे व्यक्तीमत्व : पप्पू गिते
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली की, अंजली वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ दीपक घाटे हा बिंगो जुगार लोकांकडुन पैसे घेवून आकड्यावर पैसे लावुन खेळत व खेळवित आहे. निरीक्षक सानप यांनी तात्काळ एक पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या.
संभाजी ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश परकाळे
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावून अचानक छापा टाकला असता, एक इसम समोर एलसीडी स्क्रीन लावलेली व त्याचे समोर तीन ते चार लोक उभे असलेले दिसले. पोलीस पथकाची छापा टाकला असता उभे असलेले लोक पोलीस आल्याचे पाहुन पळुन गेले तर दीपक निळकंठ घाटे हा पोलिसांच्या ताब्यात सापडला.
राठोड क्षत्रिय समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी विक्रम राठोड
रोख रक्कम, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा दोन लाख 76 हजार 580 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सानप, पोलीस अंमलदार पांढरकर, आंधळे, सानप यांच्या पथकाने केली.
