दोन सोनसाखळी चोरांना अटक; 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


। अहमदनगर । दि.13 मार्च । शहर व तालुक्यात झालेल्या चोर्‍यांच्या तपासाला पोलिस उपअधिक्षक राहुल मदने यांनी गती देत मोहीम हाती घेतली आहे. चोर्‍यांचा उलगडा होत असल्याने अनेक आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

बुधवारी वडगावपान येथे महिलेचे मंगळसूत्र पळविणार्‍या दोघा सोनसाखळी चोरांना शनिवारी पोलिस पथकाने 7 लाखाच्या मद्देमालासह अटक केली.

किशोरी अमित लोंढे (वडगावपान) बुधवारी स्वामी समर्थ केंद्रातून संगमनेर-लोणी रोडने घरी जात होत्या. दोन चोरट्यांनी पल्सरवरून येत त्यांचा गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून लोणीच्या दिशेने पळून गेले.

लोंढे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल होता. ग्रामस्थांच्या मदतीने सोनू ऊर्फ भैरव विश्वनाथ पवार, अविनाश ऊर्फ आवड्या देविदास केंधळे (नायगाव, सिन्नर) या दोघांना विश्वासात घेत अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post