। अहमदनगर । दि.03 एप्रिल । दामोधर बिर्यानी हाऊसचे राजेंद्र ससे यांना सकाळ समूहाच्यावतीने ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र 2022’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याबद्दल त्यांचा जिजाऊ प्रतिष्ठानचे सदस्य पप्पु गिते, श्रीपाद दगडे, दत्तात्रय साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन जगताप, प्रशांत गंधे, निलेश म्हसे, अमोल लहारे, उदय अनभुले, अॅड.चेतन रोहोकले, रामदास वाघ, अतुल लहारे, नितीन सळुंके, अविनाश जायभाय आदी उपस्थित होते.
याप्रसंगीस पप्पू गिते म्हणाले, आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यातून राजेंद्र ससे यांनी आपल्या कार्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वांच्या मदतीला धावून येणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सुपरिचित आहे. विविध समाजोपयोगी उपक्रमातून दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देत मोठा मित्र परिवार निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांच्या सत्कार्यास आमच्याही शुभेच्छा राहतील, असे सांगून अभिनंदन केले.
याप्रसंगी राजेंद्र ससे म्हणाले, चांगली संगत, चांगला मित्र परिवार असला की, आपले विचारही सकारात्मक होत असतात. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून चांगले काम उभे राहत असते. सर्वांच्या सहकार्याने विधायक कामे आपल्या हातून होत आहे. मिळालेला पुरस्कार आणि आज केलेल्या सत्काराने आपणास काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.
यसावेळी श्रीपाद दगडे यांनी राजेंद्र ससे यांच्या कार्याचा गौरव करुन प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. शेवटी निलेश म्हसे यांनी आभार मानले.
