दि अंबिका महिला बँकेस दोन कोटी सहा लाखाचा ढोबळ नफा


। अहमदनगर । दि.24 एप्रिल । महाराष्ट्र राज्यात महिला बँक गटातून नऊ वेळेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्राप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील दि. अंबिका महिला बँकेसन 2022 -2023 या आर्थिक वर्षांमध्ये रुपये दोन कोटी सहा लाख मात्र ढोबळ नफा झालेला आहे. आवश्यक त्या सर्व तरतुदी पूर्ण करून बँकेस रक्कम रुपये 111.01 लाख निवळ नफा झालेला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रुपये 148.79 कोटींचा झाला असून बँकेस “बँक बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड 2022” हा पुरस्कार बँकेला मिळाला असल्याचे अध्यक्ष सौ आशा मिस्कीन यांनी सांगितले

त्यापुढे म्हणाल्या की या आर्थिक वर्षात बँकेने सर्वोत्तम कामगिरी केली असून बँकेचे भाग भांडवल व स्वनिधी रक्कम रुपये 14.20 कोटी असून ठेवी रक्कम रुपये 92.96 कोटी रुपये आहे. बँकेचे कर्ज वितरण रक्कम रुपये 55.83 कोटी असून गुंतवणूक रक्कम रुपये 46.89 कोटी केलेली आहे बँकेचा सी आर ए आर 21.92 टक्के आहे. तसेच सभासद कर्जदारांच्या क्रियाशील सहकार्यामुळे नेट एनपीए शून्य टक्के राखण्यास बँकेस यश आलेले आहे. बँकेने सलग दहा वर्ष सभासदांना १३ टक्के लाभांश दिलेला आहे हे सांगण्यास अभिमान वाटतो यामध्ये बँकेचे सर्व सभासद ग्राहक सर्व संचालिका मंडळ व कर्मचारी रुंद यांचा मोठा वाटा आहे.

बँकेने चालू आर्थिक वर्षात नुकतीच यशस्वीरित्या मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित केलेली आहे. बँक आधुनिक बँकिंग सेवा देण्यास तत्पर आहे. तसेच बोल्हेगाव नवनागापूर येथे ग्राहकांच्या सेवेसाठी लवकरच बँकेच्या नवीन शाखेचा शुभारंभ करीत आहोत अशी माहिती बँकेच्या उपाध्यक्ष पुष्पा मरकड यांनी दिली

बँकेच्या संस्थापिका परा मेधाकाळे म्हणाल्या की बँकेने ठेवीवरील व्याजदरत वाढ केली आहे. कर्जाच्या कमी व्याजदरचा लाभ घ्यावा. तसेच बँकेच्या सर्व शाखांमध्ये ग्राहकांसाठी लॉकर्स सुविधा उपलब्ध आहेत. बँकेला सातत्याने चांगल्या कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार मिळत आहे. यावर्षी तो मिळाल्याने सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह गतिमान ग्राहक सेवा देणे ही कामे संचालक मंडळाने प्राधान्याने हाती घेतलेले आहेत.

बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक आणि सर्व संचालिका प्रा. डॉ. सौ . संध्या जाधव, प्रा. सौ. पुष्पलता वाघ, डॉक्टर क्रांती अनभुले, प्रा. सौ. सुमन गोसावी, सौ. शांता मोरे, एडवोकेट सौ शारदा लगड, सौ. भारती आठरे, सौ.  सविता गांगर्डे, सौ. सरोजिनी चव्हाण, सौ. शोभना चव्हाण, सौ. ऍड विजय काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकुश गायकवाड या सर्वांच्या प्रयत्नामुळे बँकेची प्रगती होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post