विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन वॉटर प्युरिफायर भेट

विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन वॉटर प्युरिफायर भेट

मॅरेथॉन डिजिटल होल्डिंगचा कौतुकास्पद उपक्रम


। अहमदनगर । दि.24 एप्रिल । मॅरेथॉन डिजिटल होल्डिंग अहमदनगर शाखेतर्फे अपंग कल्याणकारी मंडळाच्या जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयाला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आला.

विद्यालयात वॉटर प्युरिफायर कमी असल्याचे मुख्याध्यापक आरोटे यांनी सांगितल्याने, विद्यालयातीची गरज ओळखून विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे या हेतुने आम्ही हि भेट देत असल्याचे अक्षय राऊत यांनी सांगितले. विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार असल्याने मुख्याद्यापक आरोटे यांनी मॅरेथॉन डिजिटल होल्डिंगचे आभार मानले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्ष विद्याताई जोशी, मुख्याध्यापक विजय आरोटे, इनोव्हिटा मीडियाचे अक्षय राऊत, किमया गांधी, सागर थोरात इत्यादी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post