मराठा पतसंस्था निवडणूक : नविन चेहर्यांना संधी : इंजि. विजयकुमार ठुबे
सत्तारूढ मंडळाकडून सात विद्यमान तर नऊ नवीन चेहरे रिंगणात
। अहमदनगर । दि.12 एप्रिल । अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था दि.23 एप्रिल रोजी होणार्या निवडणुकीसाठी मराठा नागरिक पतसंस्थेचे संस्थापक व विद्यमान चेअरमन विजयकुमार ठुबे यांच्या नेतृत्वाखालील राजमाता जिजाऊ सहकार पॅनलने विद्यमान संचालकांपैकी काही संचालकांना तर काही नवीन चेहर्यांना संधी देऊन एक परिपूर्ण मंडळ सभासदांसमोर ठेवले असल्याची माहिती पॅनल प्रमुख इंजिनिअर विजयकुमार ठुबे यांनी दिली.
मराठा पतसंस्था निवडणुक : 17 जागांसाठी रिंगणात 34 उमेदवार
विद्यमान अध्यक्ष विजयकुमार ठुबे, उपाध्यक्ष सतीश इंगळे, ज्ञानदेव पांडुळे, किशोर मरकड, काशिनाथ डोंगरे, राजश्री शितोळे यांना पुन्हा संधी देण्यात आली असून पूर्वी संचालक राहिलेले बाळासाहेब काळे, किसनराव पायमोडे, यशवंतराव शिंदे व संस्थेचे मुख्य प्रवर्तक लक्ष्मण सोनाळे यांना संधी दिली आहे. तर पाच नव्या चेहर्यांना संधी दिली आहे.
मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!
उमेदवार पुढील प्रमाणे
सर्वसाधारण प्रतिनिधी
1) इंजि. विजयकुमार ठुबे
2) सतिश इंगळे
3) बाळकृष्ण काळे
4) ज्ञनदेव पांडुळे
5) काशिनाथ डोंगरे
6) लक्ष्मण सोनाळे
7) ज्ञानेश्वर अनभुले
8) व्दारकाधिश राजेभोसले
9) किसनराव पायमोडे
10) बाळासाहेब सोनाळे
11) संभाजी मते
12) यशवंत शिंदे
महिला राखीव
1) शिवमती राजश्री शितोळे
2) डॉक्टर कल्पना ठुबे
इतर मागास
1) किशोर मरकड
वि.जा.भ.ज.वि.मा.प्र.
1) अॅड.राजेश कावरे
संभाजी ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश परकाळे
आदींना संधी देण्यात आली आहे. यावर्षी पतसंस्थेच्या इतिहासांत प्रथमच निवडणूक होत असल्याने व अनेकांनी इच्छा प्रगट केल्याने उमेदवारी निवडताना मोठी अडचण निर्माण झाली होती. पण अनेकांनी मोठ्या मनाने माघार घेऊन सहकार्य केले. यामध्ये सर्वसाधारण 12 जागा, दोन महिला, दोन राखीव, असे एकूण 16 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. पॅनल करताना यामध्ये इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायिक, शिक्षक, वकील, समाजसेवक, असा समावेश करण्यात आला आहे.
राजेंद्र ससे दुर्लक्षितांना मदतीचा हात देणारे व्यक्तीमत्व : पप्पू गिते
अनेक वर्ष मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड संबंधित असलेल्या उमेदवारांचा विचार प्राधान्याने केला आहे. दिलेले उमेदवार हे अत्यंत सक्षम व समाजामध्ये नैतिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहेत. तसेच यावेळी तालुक्यात ज्या ठिकाणी शाखा आहेत तेथील उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये नेवासा पाथर्डी - शेवगाव - संगमनेर - कर्जत - श्रीगोंदा या तालुक्यांना सुद्धा उमेदवारीसाठी प्रधान्य देण्यात आले आहे.
