। अहमदनगर । दि.03 एप्रिल । संभाजी ब्रिगेडच्या उत्तर जिल्हाध्यक्षदी शिवाजी पवार यांची निवड तर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश परकाळे यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत तशी घोषणा संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी केली.
यावेळी प्रदेश प्रवक्ते भानुसे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, प्रदेश संघटक डॉ.संदिप कडलग, स्वप्नील डावखर, मराठा सेवा नागरी सहकार पतसंस्थेचे संस्थापक इंजि.विजयकुमार ठुबे, विठ्ठलराव गुंजाळ, मच्छिंद्र पाटील गुंड, राजेश खोजे, सागर पाटील मुठे, अशितोष निकम, ज्ञानेश्वर लबडे, तुकाराम लबडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रवक्ते भानुसे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती पाहता महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले आहे, देशांमध्ये 2014 सालापासून थेट अधिकारी वर्ग डायरेक्ट त्याची नेमणूक केली जाते, 68 हजार कोटी रुपयांचे उद्योगाचे कर्ज माफ केले जाते, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या संदर्भामध्ये आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाते, या सर्व बाबी पाहता एक प्रकारे देशांमध्ये आता हुकुमशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत युती केलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आम्ही सर्व निवडणुका एकत्रितपणे लढणार आहोत आमच्या वाट्याला जे जे काही जागा येतील त्यावर आम्ही चर्चा करून निवडणूक लढणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही सर्व जागांवर आमची तयारी प्रत्येक ठिकाणी या अगोदरच सुरू केलेली होती असे त्यांनी सांगितले ,
Tags:
Politics
