। अहमदनगर । दि.10 एप्रिल । यावर्षी जिल्हयात प्रथमच नागरिकांना ऐन उन्हाळ्यात विचित्र अशा वातावरणाचा अनुभव येताना दिसत आहे. मार्च महिना संपला असला आणि एप्रिल सुरु झाला असला तरी ऊन व वातावणातील बदलाचा खेळ सुरु असल्याचे पाहिला मिळत आहे.
दोन तिन दिवसापांसून नगरमध्ये सकाळी रखरखते ऊन आणि सायंकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने विचित्र अनुभव मिळत आहे. अशा या आगळ्या वेगळ्या वातावरणातून विविध आजारांना देखील निमंत्रण मिळण्याची अधिक आहे. नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या जरी काही ठिकाणी वातावरण ढगाळ असले तरी एप्रिल महिन्यातील पुढील तीन आठवडे व त्यानंतर संपुर्ण मे महिन्यातील वाढते तामान व ऊन नागरिकांना हैरान करुन सोडण्याची चिन्हे दिसत आहेत.
ऊन पावसाचा खेळ चार आठ दिवसात संपला तरी मे महिना सर्वांनाच हैरान करुन सोडणार असल्याचे बोलले जात आहे. मे महिन्यात कडक उन तापले तर उष्णतेमुळे शरीरातून घामाच्या धाराही वाहू लागल्या शिवाय राहणार नाही असे म्हंटले जात आहे.
शेतकरी पुन्हा चितेंत
जिल्हयात शेतकरी वर्ग खरीप हंगामासह रब्बी हंगामातही उन्हाळी धान पीक घेऊन उत्पन्न घेतात. खरिपाच्या तुलनेत रब्बी हंगाम लागवड क्षेत्र अत्यल्प असले तरी यावर्षी मोठ्या आशेने बर्याच प्रमाणात शेतशिवारात उन्हाळी धान पिकाची लागवड केल्याचे दिसते मात्र धन पिकावर अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचे सावट घोंगावत आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी राजा पुन्हा चिंतेंत आहे.
Tags:
Breaking
