। अहमदनगर । दि.09 एप्रिल । विना परवाना बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांनी छापे टाकली. या कारवाईत 2 लाख 24 हजार रुपये किंमतीचे हातभट्टी दारु बनवण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व तयार हातभट्टी दारू नष्ट केली. ही कारवाई नगर तालुक्यातील खंडाळा, नेप्ती रानमळा गावच्या शिवारात केली.
पाळणा दुर्घटनेतील जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत : पालकमंत्री विखे-पाटील
या बाबतची माहिती अशी की नगर तालुका पोलीसाना माहिती मिळाली की नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत खंडाळा व नेप्ती रानमळा गावचे शिवारात अवैध धंदे (गावठी हातभट्टी दारु अड्डे) मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभारी पोलिस अधिकारी शिशिरकुमार देशमुख यांनी पथक तयार करून हातभट्टीच्या अड्यांवर छापे टाकून बाळू उर्फ बाळासाहेब नाथा जपकर (रा. नेप्ती ता. नगर) पोपट गिरधारी गिरे (रा. खंडाळा ता.नगर) व एका महिला यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
प्रिटींग व्यावसायिकावरील हल्ल्याचा असोसिएशनच्यावतीने निषेध
कारवाई दरम्यान तीन गावठी हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्यात आले. कारवाईत 2 लाख 24 हजार रुपये किमतीचे 2 हजार 800 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन व 8हजार 500 रुपये किमतीची 85 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू,व रसायनाची प्लॅस्टिक टिपाड व बॅरल व ड्रम जागीच नाश करण्यात आले.
मोटार वाहन निरीक्षकांचा एप्रिल महिन्यातील तालुकानिहाय दौरा जाहीर
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग, पोलीस अंमलदार सहायक फौजदार भरत धुमाळ, पोना राहुल शिंदे, योगेश ठाणगे, संभाजी बोराडे विक्रांत भालसिंग, विशाल टकले यांच्या पथकाने केली.
