पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेत सत्तांतर

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेत सत्तांतर ;

विकास पॅनेलचे 21 पैकी 19 उमेदवार विजयी

 । अहमदनगर । दि.23 मार्च । पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये विकास पॅनेलने 21 पैकी 19 जागांवर विजय संपादन करत वर्चस्व प्रस्थापित केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत विरोधी सहकार पॅनेलला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले.

पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदार पार पडले. यावेळी 1 हजार 430 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दि.19 रोजी झालेल्या मतमोजणीत किशोर गांगर्डे व दत्तात्रय गडाख यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनेलने तब्बल 7 वर्षांनी पतसंस्थेमध्ये सत्तांतर घडवून आणले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ए.ए.शेख यांनी काम पाहिले. निकाल जाहीर होतांच विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

विजयानंतर बोलतांना विकास पॅनेलचे अध्यक्ष किशोर गांगर्डे म्हणाले, पॅनेलचे माजी अध्यक्ष, चेअरमन व ज्येष्ठांचे मार्गदर्शन विकास पॅनेलला लाभले. तसेच ज्यांनी ज्यांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो. निवडणुक प्रचारात जो वचननामा जाहिर केला होतो त्यांची वचनपुर्ती आम्ही सर्व करुन, संस्थेचा पारदर्शी व सभासद हितांचा कारभार करु, असे सांगितले.

विकास पॅनेलचे विजय उमेदवार व त्यांना मिळालेले मते पुढीलप्रमाणे : दत्तात्रय आवारी (727), सुरेश ढोमसे (665), अशोक राशीनकर (762), देवीदास शेटे (766), गणेश कवडे (746), रविंद्र यादव (725), संदिप शेरकर  (718), संतोष जायभाय (725), संदिप पवार (739), जगदिश वाघ (716), किशोर गांगर्डे (721), अरविंद वाव्हळ (744), अमृता पोळ (737), संभाजी निमसे (748) दिपक वाघ (760), विशाल सरोदे (699), अर्चना गायकवाड -निकाळजे (692), महेश भावसार (746), किशोर सांगळे (751).

Post a Comment

Previous Post Next Post