। अहमदनगर । दि.09 जुन । गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद, सोन्या उर्फ संतोष पांडुरंग बंगाळ असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळोलेली माहिती अशी की, मा.पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी अवैधरीत्या शस्त्र बाळगणार्या विरुद्ध कारवाई करण्या बाबत सूचना केल्याने
अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गोपनीय माहिती मिळाली की प्रवरासंगम बस स्टॅन्ड तालुका नेवासा येथे एक मध्यम बांध्याचा मुलगा देशी बनावटीचा कट्टा अग्निशस्त्र व काडतूस विक्री करण्यासाठी येणार आहे.
प्रवरासंगम येथे सापळा लावून थांबले असताना सोन्या उर्फ संतोष पांडुरंग बंगाळ वय 29 वर्ष रा.रोटेगाव ता.वैजापूर,जि.औरंगाबाद, असे सांगितले त्याची पंचां समक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जामध्ये 30,000 रू किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व 400 रू किमतीचे 2 जिवंत काडतुसे असा 30,400 रू किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुद्ध पोना/185 ज्ञानेश्वर शिंदे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिली असून त्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला गु.र.नं.459/2022 भारतीय हत्यार कायदा कलम3/25/7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
---------------
यंदाही मुलींचीच बाजी! जिल्ह्याचा 94.41 टक्के निकाल
बारावीत नापास झाल्याने युवकाची आत्महत्या
भाजपकडून पंकजा मुडें यांना डावलले!
Tags:
Crime