। मुंबई । दि.08 जून 2022 । एकीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असताना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेनंतर आता भाजपनेही विधान परिषदेसाठी आपल्या उमेदवारांचे नाव निश्चित केले आहे .
या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच या सर्व नेत्यांची नावे जवळपास निश्चितही करण्यात आल्याची माहिती आहे.
लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवार यादीतून पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Tags:
Breaking