राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून मिळाली काव्या आणि दिव्याला ऐकण्याची आणि बोलण्याची संधी


। अहमदनगर । दि.09 जुन । अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथील संदीप गोरख वाटमोडे यांच्या काव्या आणि दिव्या या साडे तीन वर्षे वयाच्या जुळ्या मुली जन्मतःच मूकबधिर होत्या. त्यांचे वडील संदीप वाटमोडे आणि आई प्रियांका वाटमोडे हे दोघेही जन्मतःच मूकबधिर आहेत. दरेवाडी येथील त्यांचे मामा निलेश करांडे आणि नंदकुमार करांडे यांनी या जुळ्या मुलींवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मोफत शस्रक्रिया करण्यात आली आहे. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने आता या मुलींना ऐकता आणि बोलता येऊ लागले आहे. याबद्दल निलेश करांडे आणि नंदकुमार करांडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय बालकांच्या आरोग्याचे संवर्धन आणि विकास साधण्याकरता केंद्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

बालकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यात आढळणार्‍या आजारावर वेळीच उपचार करून वेळीच पायबंद घालणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अहमदनगर मधील अनेक बालकांवर आत्तापर्यंत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यांना जीवनदान मिळाले आहे. गरिबी आणि दारिद्र्यात खितपत पडलेल्या अनेक कुटुंबांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेचा मोठा आधार मिळत आहे.  

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अहमदनगर मधील बोल्हेगाव येथील संदीप गोरख वाटमोडे यांच्या काव्या आणि दिव्या या जुळ्या मुलींवर मुंबई येथे कोकिलाबेन हॉस्पिटलला शस्त्रक्रिया झाली. जन्मतःच मूकबधिर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी  20 लाख रुपये खर्च आला असता. परंतु शेतीत काबाडकष्ट करून तसेच दुग्धव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालविणार्‍या संदीप गोरख वाटमोडे यांच्यावर संकटांचा मोठा डोंगर कोसळला होता.

परंतु त्यांचे मेहुणे निलेश करांडे आणि नंदकुमार करांडे यांनी जन्मतःच मूकबधिर असणार्‍या काव्या आणि दिव्यावर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली शास्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या शासकीय योजनेतून या दोन्ही मुलींवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या दोन्ही मुलींना हॉस्पिटलमध्ये  कर्णयंत्रेही उपलब्ध करून देण्यात आलिया आहेत.  काव्या आणि दिव्या या दोघींनाही आता चांगल्या प्रकारे ऐकता आणि बोलता येऊ लागले.  

-------------------

कुस्तीत सुवर्णसह तीन पदके; मुला-मुलींच्या संघाने पटकावले सर्वसाधारण उपविजेतेपद

जिल्ह्यातील 11 गुंडांना पोलिसांनी दाखवला जिल्ह्याबाहेरचा रस्ता... 

खते, बियाणे बाबत तक्रारी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन 

Post a Comment

Previous Post Next Post