सोन्या-चांदीच्या दरात घसरण


 । मुंबई । दि.14 जुन 2022 । सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. लग्नसराईचा हंगाम असूनही सोन्याची मागणी कमी होत असल्याने भाव 50 हजारांच्या जवळ आले आहेत. मंगळवारी सकाळी चांदीचीही 60 हजारांने विक्री झाली.

आज सोन्याचा दर  50,725 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर कालच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51,435 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 710 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे.

मात्र असं असूनही सोने आजही त्यांच्या उंच्चाकी पातळीपेक्षा 5,475 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

-------------------

एमआयडीसी परिसरातील सराईत भाकरे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई 

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या खो-खो संघांनी जिंकले सुवर्णपदक

पारनेरमध्ये मोबाईल हिसकावणारे दोघे गजाआड ; ‘एलसीबी’ची कारवाई 

Post a Comment

Previous Post Next Post