। अहमदनगर । दि.12 जुन । टीम 57 फॅमिली पान पकवान दालनाने गेल्या एक वर्षांमध्ये आपल्या व्यवसायाबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांनी महात्मा फुले चौकातील टीम 57 फॅमिली पान पकवान दालनाला अचानक पणे जाऊन भेट दिली व पानांच्या विविध प्रकारची माहिती घेऊन पानाचा आस्वाद घेतला.
यावेळी समवते आ.अरुणकाका जगताप, आ. संग्राम जगताप, दालनाचे संचालक स्वप्नील पर्वत आदीसह नागरिक उपस्थित होते. टीम 57 दालनाने अल्पवधीकाळात सेवेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. व्यवसायात स्वतःचा ब्रँड तयार केला आहे हा ब्रँड महाराष्ट्रभर ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, या दालनांमध्ये सुमारे पाचशे प्रकारचे पान ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
---------------
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार : प्रा.वर्षा गायकवाड
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना लगाम! केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जारी
Tags:
Ahmednagar