कोविड डोस घेतला का म्हणत; सोन्याचे गंठण लांबवले


। अहमदनगर । दि.11 जुन । कोविडचा डोस घेतला का? अशी विचारणा करण्यासाठी घरात घुसलेल्या चौघांनी अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरून नेले. गुरूवारी दुपारी एक वाजता सिव्हील हाडकोमधील क्रांती चौकात वैष्णवी मंदिराजवळ ही घटना घडली.

या प्रकरणी वत्सला मुरलीधर लाटे (वय 77, रा. सिव्हील हाडको) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चार जणांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वत्सला लाटे गुरूवारी दुपारी घरामध्ये असताना त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला.

त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता चार अनोळखी व्यक्ती तेथे होत्या. त्यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे कोविडचा डोस घेतला का, कोणत्या तारखेला घेतला, पावती दाखवा, असे प्रश्न विचारले.

यातील काही व्यक्तींनी फिर्यादी यांच्या घरातील कपाट उघडून कपाटामध्ये ठेवलेले अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ते चौघे गेल्यानंतर चोरीचा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आला. त्यांनी तोफखाना पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.

-------------------

२२१ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची २१ जूनला प्रसिद्धी 

रोजगार मेळाव्याचे 15 जून रोजी आयोजन

पोलिस दलातील 32 जणांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती 

Post a Comment

Previous Post Next Post