। अहमदनगर । दि.11 जुन 2022 । खासगी क्लासेस चालवत असलेल्या एका तरुणाला तिघांनी मारहाण केल्याची घटना डॉन बॉस्को चर्चजवळ घडली. किरण मधुकर मकासरे (वय 29, रा. डॉन बॉस्को कॉलनी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहीत सुधीर गायकवाड, आशिष सुधीर गायकवाड व सुधीर पीटर गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. किरण मकासरे व गायकवाड कुटूंबाचे पूर्वी दोन ते तीन वेळा किरकोळ वाद झाले होते. 5 जून रोजी किरण हे डॉन बॉस्को चर्चजवळून घरी जात असताना रोहित व आशिष यांनी किरणला अडविले. शिवीगाळ करीत लाकडी काठीने मारहाण केली. त्यावेळी सुधीर तेथे आला. त्यानेही शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
------------------
कोविड डोस घेतला का म्हणत; सोन्याचे गंठण लांबवले
२२१ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची २१ जूनला प्रसिद्धी
Tags:
Ahmednagar