अहमदनगर पोस्टल सोसायटीची 102 वी वार्षिक सभा मोठया उत्साहात पार पाडली


। अहमदनगर । दि.15 जुन । अहमदागर पोस्टल सोसायटीची 102 वी वार्षिक सभा रविवारी मोठया  उत्साहात पार पाडली. यावेळी सभासदांचे गुणवंत पाल्यांचा गुण गौरव व सेवा निवृत्त सभासदांचा सत्कार पोस्ट खात्याचे  डाक  निरिक्षक अमीत देशमुख,  व श्रीरामपूर विभागचे सहाय्यक अधिक्षक बाळासाहेब बनकर यांचे हस्ते करण्यात आला. सभेच्या अध्यक्ष स्थानी चेअरमन निसार शेख होते. यावेळी सभासद कर्ज  मर्यादा 25 लाख करणे, जामीनकी पध्दत बंद करणे करीता हमीनिधी उभारणे,  कायम ठेव रकमेत वाढ करणे या पोटनियम दुरुस्तीसह विषय पत्रिकेवरील 11 विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळ बिनविरोध निवडीनतरची पहिलीच वार्षिक सभा असल्यामुळे सभासंदामध्ये मोठा उत्साह होता. यावेळी राज्याच्या  विविध भागातुन आ लेल्या सभासदांनी नूतन संचालकांचा भव्य सत्कार सोहळा केला. या सत्कार सोहळयास  उत्तर देताना  चेअरमन मा निसार शेख म्हणाले की, मागील 25 वर्षापासून एकहाती सत्ता सांभाळत सभासदांचा संपादन  केलेला विश्वास आणि पारदर्शी कारभाराची परंपरा यापुढेही कायम ठेवली जाईल.

सेक्रेटरी प्रफुल्लकुमार काळे यांनी  संस्थेच्या कामकाजा  लेखाजोंखा सभेमध्ये सादर केला  लांभाश 7%  व कायमठेवीवर 11% व्याज  देण्यात आले असून  सभासदांच्या पाल्यांच्या विवाह प्रसंगी रु 5555/- सप्रेम भेट देण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. संस्थेचे व्हाईस चेअरमन रामेश्वर ढाकणे यांनी  आभार मानले. 

यावेळी संस्थेचे संचालक प्रमोद कदम, किशोर नेमाणे, अमीत कोरडे, महेश तामटे, बळी जायभाय, शिवाजी  कांबळे, सुनिल कुलकर्णी, सौ स्वप्ना चिलवर, सौ अर्चाना  दहिंडे, मिलींद भोंगले, अनिल गांधी, दत्ताञय जासूद,  प्रताप कारखिले, महेश दांगट, जगदीश पेलेवाड, धनंजय  दैठणकर, सतीश येवले , अविनाश आढाव, सचिन  देवकाते, गणेश केसकर, सुनिल धस, आनंद कात्रजकर, जावेद शेख, बाबासाहेब बुटटे, अंबादास सुद्रिक आदीसह मोठया संख्यणे  सभासद  उपस्थित होते.

-------------

राज्यात येत्या ५ दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता

युवकाच्या खुनाचा प्रयत्न; तिघांना अटक 

सोन्या-चांदीच्या दरात घसरण 

Post a Comment

Previous Post Next Post