युवकाच्या खुनाचा प्रयत्न; तिघांना अटक

। अहमदनगर । दि.15 जुन । युवकावर तलवार, कोयता, चॉपर व लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. शेहबाज ऊर्फ बाबा शौकत शेख (वय ४०), अल्तमाश ऊर्फ अल्लु शौकत शेख (वय ३२) व इम्तियाज मेहब्बुअलि शेख (वय ४१, तिघे रा. शनिगल्ली, झेंडीगेट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

६ जून रोजी हाशिर एजाज शेख (वय २३ रा. झेंडीगेट) या युवकाला ११ ते १२ जणांनी मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून ११ ते १२ जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कराचीनगर जाणार्‍या रोडवरील हुंडेकरी पार्किंगजवळ ही घटना घडली होती. 

हाशिर व त्याचे चुलते मारूफ रियाज शेख (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) यांच्यामध्ये सुमारे तीन वर्षांपासून घराचे जागेवरून वाद आहेत. ३ जून रोजी हाशिर यांच्या वडिलांचा व मारूफ यांचा एका वलिमा कार्यक्रमात वाद झाला होता. 

६ जून रोजी रात्री साडेदहा वाजता हाशिर याला ११ ते १२ जणांनी कराचीनगर रोडवर हुंडेकरी पार्किंगजवळ तलवार, कोयता, चॉपर, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विश्‍वास भान्सी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. या गुन्ह्यातील इतर आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

-------------

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण 

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते फुले ऍग्रोमार्ट पोर्टलद्वारे कांदा बियाणे विक्री सुरु 

बालकांच्या शाळेतील स्वागतासाठी शिक्षण विभाग सज्ज : शालेय शिक्षण मंत्री

Post a Comment

Previous Post Next Post