पायी चाललेल्या महिलेचे दोन तोळ्याचे गंठण ओढले


। अहमदनगर । दि.28 मे 2022 । रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून धूम ठोकली. सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक जाणार्‍या रोडवर गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा संतोष गोबरे (वय 47, रा. मार्केडेय सोसायटी, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गोबरे या गुरुवारी रात्री त्यांच्या मुलाला आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक या रस्त्यावरून त्या जात असताना पंढरपुरी चहाजवळ समोर आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने गोबरे यांच्या गळ्यातील 

दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडले व चोरटे भिस्तबाग चौकाकडे जाणार्‍या रस्त्याने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, संपत कन्हेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. गोबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोळुंके करीत आहेत.

---------------

कोल्हापूरचे प्रशांत जाधव व सातार्‍याचे विजय शिंदे यांना विरमरण 

खंडणी देण्यास नकार दिल्याने मारहाण

खंडणी देण्यास नकार; हॉटेल चालकास मारहाण 

Post a Comment

Previous Post Next Post