हर्षवर्धन सदगीरने पटकावले विजेतेपद

। अहमदनगर । दि.29 मे 2022 । छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धेेच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर याने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळे याचा ८ विरुद्ध ० गुणांच्या फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. तो अडीच किलो वजनाची चांदीची गदा व ५ लाख रुपयांच्या रोख पारितोषिकाचा मानकरी ठरला. तर महिलांच्या खुल्या गटात राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मल्ल रेश्मा माने ही विजेती ठरली. तिला १ किलो वजनाची चांदीची गदा व एक लाख रुपयांचे राेख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

किरण काळे यूथ फाऊंडेशन व जिल्हा तालिम संघाच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात गेले दोन दिवस ही स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत कुस्तीप्रेमींना एकाहून एक रोमहर्षक कुस्त्यांच्या लढती पहायला मिळाल्या. शनिवारी सायंकाळी ५ मिनिटांच्या मॅटवरील अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीरने शुभम शिदनाळेवर मात केली, अन् क्रीडाप्रेमींनी एकच जल्लोष केला.

महिलांच्या खुल्या गटात राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मल्ल रेश्मा माने हिने आंतरराष्ट्रीय ख्यातीची पैलवान प्रतिक्षा बागडे हिला चितपट केले. या विजेत्यांसह इतर वजनगटातील विजेत्यांना राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व आमदार सुधीर तांबे, लहू कानडे, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, नगर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, क्रीडा अधिकारी आदींच्या उपस्थितीत १६ लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील विविध गटातील विजेते
अंतिम लढत - हर्षद सदगीर, उपविजेता - शुभम शिदनाळे, तिसरा विजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर). ५७ किलो - ज्योतिबा अटकाळे (सोलापूर), अभिजीत पाटील (कोल्हापूर), सौरभ इगवे (सोलापूर). ६५ किलो - नामदेव कोकाटे (पुणे), विक्रम कुऱ्हाडे (कोल्हापूर), ७४ किलो - निखील कदम (पुणे), शुभम थोरात (पुणे), अक्षय हिरगुडे (कोल्हापूर), ८४ किलो - काैतुक डाफळे (कोल्हापूर), विकास मोरे (नाशिक), विजय सुरुडे (नाशिक). मुली ५४ किलो - धनश्री फंड (नगर), स्मिता पाटील (कोल्हापूर), ५७ किलो - सोनाली मंडलीक (नगर), विश्रांती पाटील (कोल्हापूर), ६५ किलो - रेश्मा माने (कोल्हापूर), उपविजेती - प्रतिक्षा बागडे (सांगली). महिलांच्या खुल्या गटात राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मल्ल रेश्मा माने हिने आंतरराष्ट्रीय ख्यातीची पैलवान प्रतिक्षा बागडे हिला चितपट केले.

Post a Comment

Previous Post Next Post