लडाखमध्ये सैन्यदलाचे वाहन नदीत कोसळून 7 जवानांचा मृत्यू
। श्रीनगर । दि.28 मे । लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारी बस श्योक नदीत कोसळली. सैन्यदलाच्या वाहनाचा लडाखमधील टुरटुक भागातअपघात झाला आहे. या अपघातात सैन्यदलाच्या 7 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर काही जवान जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये जवान शहीद झाले तर काही जवान जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये शहीद झालेल्या जवानांपैकी दोन जवान हे महाराष्ट्रातील आहेत. यामधील एक जवान कोल्हापूरचा तर दुसरा जवान हा सातार जिल्ह्यातील आहे.
जखमींना तातडीचे उपचार देण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. भारतीय हवाई दलाने गंभीर जखमी जवानांना वेस्टर्न कमांडमध्ये हलविल्याची माहिती सैन्यदलातील सुत्राने दिली आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली.
त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले, मात्र या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला असून अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.
---------------
खंडणी देण्यास नकार दिल्याने मारहाण
खंडणी देण्यास नकार; हॉटेल चालकास मारहाण
६० कोटींच्या बनावट देयकांचा व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यास अटक