दिवसा घरे फोडणारा कोतवालीने केला जेरबंद

टोळीचा म्होरक्या पकडला...साथीदार शोध सुरू

दिवसा घरे फोडणारा कोतवालीने केला जेरबंद


। अहमदनगर  । दि.25 मे । दिवसा घरफोडी करणार्‍या टोळीचा म्होरक्या कोतवाली पोलिसांकडून मुद्देमालासह जेरबंद करण्यात आला आहे. या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला असला तरी आता त्याच्या साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील भूषणनगर उपनगरात राहणारे कुटुंब देवदर्शनाकरिता बाहेरगावी गेले असता त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख 3 हजार 100 रुपयांचे दागिने व रोख ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त माहिती बातमीदाराकडून माहिती घेऊन घरफोडी करणार्‍या टोळीच्या म्होरक्याला मुद्देमालासह अटक केली.

ही कारवाई नगरमधील गंजबाजार येथे केली. अविनाश दिलीप क्षेत्रे (राहणार भूषणनगर, केडगाव, नगर) असे या पकडलेल्या आरोपीचे नाव आहे व तो चोरीतील दागिने विकण्यासाठी गंजबाजारात आला होता. तेथे पोलिसांनी सापळा लावून त्याला जेरबंद केले.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवीद्र पिंगळे करीत आहेत. आरोपीला पकडण्याची कारवाई पोलिस नाईक गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, योगेश कवाष्टे, कॉन्स्टेबल अभय कदम, दीपक रोहकले, सुजय हिवाळे, तानाजी पवार, अमोल गाढे सोमनाथ राऊत, अतुल काजळे, पोलिस नाईक मोहन भेटे, नकुल टिपरे, कॉन्स्टेबल प्रशांत राठोड, राहुल गुंडु, महिला पोलिस कर्मचारी वसुधा भगत व छाया गायकवाड यांनी केली आहे.

----------------

रस्त्यात वाहने उभी करुन धिंगाणा घालीत रहदारीस अडथळा, 11जणावर गुन्हा दाखल  

कामरगाव घाटात अपघातामध्ये पिता-पुत्र ठार

पस्तीस वर्षीय मनोरुग्ण युवक घरासमोरून बेपत्ता 

Post a Comment

Previous Post Next Post