। अहमदनगर । दि.24 मे 2022 । शहरातील पाटील हॉस्पिटल जवळ राहात असलेला 35 वर्षीय मनोरुग्ण तरुण कुठे तरी निघून गेला. तो अद्याप परतला नाही. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
सकाळी अकराच्या सुमारास घराबाहेर उभा असलेला हेमंत अल्लाट हा पस्तीस वर्षे मनोरुग्ण अचानक कुठेतरी निघून गेला. ही बाब त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आली. त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही.
हरवलेल्या युवकाचे वर्णन असे : नाव हेमंत रमेश अल्लाट, वय 35, रंग काळा सावळा, उंची पाच फूट पाच इंच, शरीर बांधा सडपातळ, केस व टक्कल पडलेले, दाढी वाढलेली, मिशा वाढलेल्या, दात शाबूत, अंगात पेहराव निळा, पांढर्या रंगाचा हाफ शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट,
पायात चॉकलेटी रंगाची चप्पल असा आहे. या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे (फोन नंबर 0241-2416117) या फोनवर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.