। शिर्डी । दि.25 मे 2022 । समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा विश्राम करण्याचा सल्ला दिला आहे.
यामुळे त्यांचे ३० मेपर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. इंदोरीकरांचे किर्तन ऐकणाऱ्याची आणि कार्यक्रम ठेवलेल्यांचा या बातमीमुळे हिरमोड झाला आहे.
दरम्यान वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रुजू होणार आहे आपले प्रेम व आशिर्वाद सदैव पाठीशी लाभावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Tags:
Breaking