। अहमदनगर । दि.26 मे । धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी रामेश्वर विठ्ठल सोलट (वय 35, धंदा व्यापार, रा. धनगरवाडी, पो. जेऊर बायजाबाईचे, ता. नगर) यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपीतर्फे विधीज्ञ एस. आर. घावटे यांनी काम पाहिले. या खटल्याची हकीकत अशी की, रामेश्वर सोलट व निखील नंदकुमार जोशी (वय 36 वर्षे,रा.तपोवन रोड, नगर) या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते
व देण्या-घेण्याचे व्यवहार चालत होतें. सोलट यांना व्यवसायात अडचण असल्याने त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये जोशींकडून हातउसने 1 लाख 3 हजार रुपये रोख स्वरूपात सहा महिन्यांच्या मुदतीवर घेतले. त्याची रितसर उसनवार पावतीही झाली होती.
मुदतीत पैसे न आल्याने जोशी यांनी तगादा लावला असता सोलट यांनी जोशी यांना युनियन बँक ऑफ इंडियाचा 1 लाख रुपयांचा धनादेश दि. 17 मे 2019 रोजी दिला. परंतु तो न वटल्याने कलम 138 नुसार दावा दाखल करण्यात आला होता.
--------------
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक : ऊर्जा मंत्री
दिवसा घरे फोडणारा कोतवालीने केला जेरबंद
आता मान्यता नसलेल्या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यान्वये कारवाई