मंत्री अनिल परब संबंधित ७ ठिकाणी ईडीची धाड

। मुंबई । दि.26 मे 2022 । मनी लॉंड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. तसेच, परब यांच्यावर ईडीने गुन्हाही दाखल केला आहे अशीही माहिती समोर आली आहे. 

आज गुरुवार (दि. 26 मे)रोजी सकाळी पहाटे पासूनच ही छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी परब यांच्या शासकीय निवास्थानीही छापेमारी करण्यात आली आहे. एकाच वेळी धाडी पडल्याने परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत.

वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. परब यांच्या संबंधित ७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

अनिल देशमुख प्रकरणाचे तपास अधिकारी शिवालय बंगल्यात पोहचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची चौकशी करण्यात येऊ शकते.

---------------------

चेक न वटल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता 

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक : ऊर्जा मंत्री

दिवसा घरे फोडणारा कोतवालीने केला जेरबंद 

Post a Comment

Previous Post Next Post