3 री महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा
पुणे जिल्हा सर्वसाधारण विजेता तर क्रीडा प्रबोधिनी उपविजेता
। अहमदनगर । दि.20 मे । औरंगाबाद येथे झालेल्या 3 र्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने 6 सुवर्ण 4 रौप्य व 5 कांस्य पदके पटकावताना 52 गुणांसह स्पर्धेचे सर्वसाधरण विजेतेपद पटकावले तर पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने 4 सुवर्ण, 3 रौप्य व 6 कांस्य मिळवताने 41 गुणांसह स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले.
अहमदनगरच्या संघाने 32 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. औरंगाबाद जिल्हा संघाचा राष्ट्रीय सायकलपट्टू साई भिकन अंबे आणि दर्शन घोरपडे यांनी या स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी केली.
महाराष्ट्र राज्य रोड डेव्हलपमेंटचे मुख्य अभियंता आणि प्रकल्प संचालक बापुराव साळुंके यांच्या बहुमोल सहकार्याने मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गवरील हर्सुल-सावंगी विभागात या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उदघाटन सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव प्रा.संजय साठे यांचे हस्ते तर पारितोषिक वितरण समारंभ उपाध्यक्ष व वाशीम जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व खजिनदार तथा सायकलिंग असोसिएशन ऑफ औरंगाबादचे सचीव भिकन अंबे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे खजिनदार व महाराष्ट्राचे संघटन सचिव प्रताप जाधव, प्रा.साईनाथ थोरात, क्रीडा प्रबोधिनी पुणेच्या मुख्य प्रशिक्षक दिपाली निकम, मुख्य पंच धर्मेंदर लांबा, संजय सातपुते, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक बिरु भोजने, शिवछत्रपती सन्मानीत मिनाक्षी ठाकूर, संध्या पानबुडे, सोलापूर जिल्हा सचिव दीपक घंटे, नांदेड जिल्हा सचिव बंटी सोनसळे, जालना जिलल्हा सचिव विजय आगळे, अकोला जिल्हा सचिव नारायन बत्तुले, बीड जिल्हा सचिव गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितीन घोरपडे,किशोर वरदे, गणेश बनसोडे, अभिषेक शेळके, प्रथमेश मेगी, आकाश वाघमारे, राधीका अंबे, ग्रामीण रुग्नालयाचे डॉ.राठोड यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
या स्पर्धेचे अंतिम निकाल पुढील प्रमाणे:
(1) मेन इलीट (पुरुष खुला गट): 40 किमी टाईम ट्रायल: 1. सूर्या थातू 1:00:40.36 (पुणे) 2. प्रतीक पाटील 1:03:16.79 3. अनिकेत सुतार 1:06:56.62 (दोघे कोल्हापूर) 40 किमी मास स्टार्ट - प्रतीक पाटील 1:09:54.18 2. अनिकेत सुतार (दोघे कोल्हापूर) 3. यश थोरात (मुंबई शहर).
(2) मेन अंडर 23 (23 वर्षाखालील पुरुष): 40 किमी टाईम ट्रायल: 1. प्रणव कांबळे (पुणे) 59:01.84 2. ओमकार आंग्रे 1:01:51.74 3. हनुमान चोपडे 1:03:34.79 (दोघे क्रीडा प्रबोधिनीपुणे) 40 किमी मास स्टार्ट - 1. सिद्धेश पाटील 1:09:56.10 2. हनुमान चोपडे 3. भूषन चव्हान (तिघे क्रीडा प्रबोधिनी).
(3) मेन ज्युनिअर्स (18 वर्षाखालील मुले): 30 किमी टाईम ट्रायल: 1. सरोष मुंडरोनिया 44:20.64 (पुणे) 2. सुहील मुकादम 48:59.45 (रायगड) 3. ओमकार कृष्णा खेडेकर 49:25.94 (पुणे) 30 किमी मास स्टार्ट: 1. रोहीत पाटोळे 56:00.54 (क्रीडा प्रबोधिनी) 2. निसर्ग भामरे (नाशिक) सरोष मुंडरोनिया (पुणे).
(4) सब जूनियर बॉईज (16 वर्षाखालील मुले): 1. उदय टीमकरे 32:11.87 2. ओम कारंडे 33:55.34 (दोघे अहमदनगर) 3 अदिप वाघ 34:17.41 (पुणे). 30 मास स्टार्ट: 1. अदिप वाघ 54:10.92 (पुणे), 2. राखीव 3. ओम कारंडे (अहमदनगर)
(5) युथ बॉईज (14 वर्षाखालील मुले): 15 किमी टाईम ट्रायल : 1. सिद्धेश घोरपडे 24:55.84 (क्रीडा प्रबोधिनी) 2. राज कारंडे 25:30.78 (अहमदनगर) 3. ओमकार चव्हाण 25:37.83 (मुंबई शहर) 20 किमी मास स्टार्ट: 1. सिद्धेश घोरपडे 19:24.12 (क्रीडा प्रबोधिनी) 2. निरामय भट (कोल्हापूर) 3. ओमकार चव्हाण (मुंबई शहर).
(6) इंडियन मेड सायकल - पुरुष: 10 किमी टायम ट्रायल : 1. आकाश काटे 18:18.83 (नांदेड) 2. केशव शिंदे 19:40.61 (पुणे) 3. जनार्दन कोळपकर 20:24.21 (अहमदनगर) 20 किमी मास स्टार्ट: 1. राजेश जाधव 36:42.38 (वाशीम) 2. आकाश काळे (नांदेड) 3. महेश मेले (पुणे)
(7) वुमेन इलीट (महिला खुला गट) : 30 किमी टाईम ट्रायल: 1. प्रणिता सोमन 49:15.48 (अहमदनग) 2. रंजीता घोरपडे 49:32.52 (कोल्हापूर) 3. आदिती डोंगरी 56:17.72 (क्रीडा प्रबोधिनी) 30 किमी मास स्टार्ट: 1. रंजीता घोरपडे 1:04:13.23 (कोल्हापूर) 2. आदिती डोंगरी (क्रीडा प्रबोधिनी) 3. प्रणिता सोमन (अहमदनग).
(8) वुमेन ज्युनिअर (18 वर्षाखालील मुली): 30 किमी टाइम ट्रायल: 1. अपूर्वा गोरे 37:54.98 (अहमदनगर) 2. मनाली रत्नोजी 41:03.47 (पुणे) 3. सिया ललवाणी 41:52.16 (नाशिक) 30 किमी मास स्टार्ट: 1. अपूर्वा गोरे 57:10.98 (अहमदनगर) 2. सिया ललवाणी (नाशिक) 3. मनाली रत्नोजी (पुणे)
(9) सब ज्युनियर गर्ल्स (16 वर्षाखालील मुली): 15 किमी टाईम ट्रायल: 1.आकांक्षा म्हेत्रे 26:07.59 (जळगाव) 2. सिद्धी शिर्के 26:11.31 (पुणे) 3. सुजाता वाघेरे 29:19.55 (क्रीडा प्रबोधिनी) 20 मास स्टार्ट: 1. सिद्धी शिर्के 36:36.94 (पुणे) 2. आकांक्षा म्हेत्रे (जळगाव)
(10) युथ गर्ल्स (14 वर्षाखालील मुली) : 1. नीम शुक्ला 18:04.80 (मुंबई शहर) 2. श्रावणी परिट 18:06.80 (पुणे) 3. ऋतिका शेजूल 19:23.57 (क्रीडा प्रबोधिनी) 10 किमी मास स्टार्ट: 1. श्रावणी परिट 18:06.80 (पुणे) 2. नीम शुक्ला (मुंबई शहर) 3. ऋतिका शेजूळ (क्रीडा प्रबोधिनी) आदी
Tags:
Maharashtra