डॉ. म्हस्के मारहाण प्रकरणी आरोपींना अटक करावी

डॉ.म्हस्के मारहाण प्रकरणी आरोपींना अटक करावी

इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी

। अहमदनगर । दि.12 एप्रिल । तिसगाव येथील स्त्री रोगतज्ञ डॉ. निलेश म्हस्के यांना रूग्णांच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.

असोसिएशनच्या वतीने याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. डॉ. नीलेश म्हस्के यांच्या तिसगाव येथील रुग्णालयात १० दिवासांपूर्वी रुग्णावर तातडीचे उपचार करून नगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. 

तेथे रुग्णाच मृत्यू झाला. त्यानंतर मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी डॉ. म्हस्के यांच्या रुग्णालयात धुडगूस घातला व रुग्णालयातील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मोबाइल व रोख रक्कम लांबवण्यात आली. 

अशा प्रकारची अमानुष मारहाण व बदनामी करणे, हे वैद्यकीय व्यवसायामध्ये भीतीचे वातावरण तयार करण्यासारखे आहे. त्यामुळे सदर गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या नातेवाईकांवर तातडीने कारवाई करावी.

गुन्हेगारांना अटक करून खुनाचा प्रयत्न, लूटमार, एपिडेमिक डिसिस ऑर्डिनन्स कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आल्याचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखडे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, डॉ. अमित करडे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post