मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत कृतज्ञता सन्मान सोहळा


। अहमदनगर । दि.27 एप्रिल । मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत अहमदनगर मध्ये दि.3 मे रोजी सकाळी 12 वाजता, माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन जवळ, सावेडी येथे कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे यांनी दिली आहे.

जिवन गौरव पुरस्कार माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मॅनिजिंग कौन्सील सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा, जी.डी.खानदेशे, सचिव अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यासह राजमाता जिजाऊ चित्रपट निर्माती मंदाताई निमसे आदींना जाहीर करण्यात आला असून कर्म तपस्वी पुरस्कार मनगाव प्रकल्प देहरे येथील डॉ.राजेंद्र धामाणे व डॉ.सुचिता धामणे यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि.पुरुषोत्तम खेडकर यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, जिल्हाध्यक्ष इंजि.विजय घोगरे यासह प्रमुख उपस्थिती मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे, महासचिव मधुकर मेहेकरे, मुख्य अभियंता जलसंपदा विभागाचे हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेंद्र राहणे, मुख्य अभियंता जलसंपदा विभागाचे प्रकाश मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर आदी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था आणि अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.03 मे रोजी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष इंजि. विजयकुमार ठुबे, उपाध्यक्ष सतिष इंगळे, मानद सचिव राजेंद्र ढोणे, संचालक प्रा.पोपटराव काळे आदींसह

मराठा सेवा संघाचे इंजि.राजेंद्र निंबाळकर, बाळासाहेब सोनाळे, विजयराव देशमुख, रावसाहेब घुमरे, राम निकम, रामदास काळदाते, दत्तात्रय शिंदे, बबनराव वाबळे, उदय काचोळे, अरविंद बडाख, डॉ.नितीन निर्मळ, विजय उगले, प्रा.दिलीप शेणकर, बाळासाहेब आढाव 

संचालक ज्ञानदेव पांडुळे, काशिनाथ डोंगरे, किशोर मरकड, ज्ञानेश्वर अनभुले, विश्वास कारंजकर, राजेश्री शितोळे, निर्मलाताई गिरवले, शोभाताई जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, बबन सुपेकर, अशोक आरगडे, अनुपमा भापकर-सोनाळे, महेश नलवडे, प्रितेश बोरुडे आदी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशिल आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post