जवळा हत्याकांडातील आरोपींचा जामीन न्यायालयाने नाकारला


। अहमदनगर । दि.29 एप्रिल । पारनेर तालुक्यातील जवळा हत्याकांडातील आरोपी अमोल सुभाष देशमुख आणि प्रवीण दत्तात्रय चाळके यांनी जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा जामीन नाकारला.

जवळ्याचा गुन्हा अतिशय निर्दयीपणाने केलेला आहे. तसेच गुन्ह्याचे स्वरूप पाहता अत्यंत गंभीर आहे. आरोपींना जामिनावर सोडल्यास फिर्यादीवर ते दबाव आणू शकतात. दोषारोप पत्र पाहता आरोपीिंंवरुद्ध सबळ पुरावा आहे. आरोपी हे गुन्हा घडल्यापासून काही काळ फरार होते. आरोपी व फिर्यादी एकाच गावातील रहिवासी आहेत. फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन  होती व त्याच गावात शाळेत शिक्षण घेत होती. 

आरोपी अमोल देशमुख व आणि प्रवीण चाळके यांनी संगनमताने हा गुन्हा घडवून आणलेला आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे मांडण्यात आला. तर आरोपीच्यावतीने युक्तिवाद करताना या गुन्ह्यात आरोपींचा काहीएक संबंध नाही. त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत. फिर्याद उशिरा दाखल झाली आहे, असा युक्तिवाद फिर्यादीचे वकील यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या आरोपीना जामीन नाकारला. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील व मूळ फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी फिर्यादीची बाजू मांडली.

Post a Comment

Previous Post Next Post