किमान आतातरी गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा : एकनाथ खडसे


। जळगाव । दि.16 एप्रिल । राज्यात दररोज केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत. महाविकास आघाडीचे दोन मंत्री तुरुंगात आहेत.

किमान आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले.

विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शरद पवारदेखील उपस्थित होते. सभेत खडसे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चांगलेच ताशेरे ओढले.

जे एकेकाळी माझे पाय धरायचे. माझा आशीर्वाद घ्यायचे, ते आज माझ्याविरोधात आणि शरद पवारांविरोधात बोलत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

कालच देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 14 ट्वीट करत शरद पवारांवर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका केली होती. याचा संदर्भ देत एकनाथ खडसेंनी फडणवीस यांचा आज समाचार घेतला.

राज्यात रोज 100 धाडी पडत आहेत. तपास यंत्रणांचा एवढा गैरवापर कधी पाहिला नव्हता. कुणी चुकीचे केले असेल तर त्याला शिक्षा मिळायला हवी, याबाबत आपले काही म्हणणे नाही.

मात्र, तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे, असा आरोप यावेळी खडसे यांनी केला.

--------------- 

खालील बातम्या देखील वाचा...

महावीर जयंतीनिमित्त राजभवन येथे ‘महावीरोत्सव’ संपन्न 

महाराष्ट्रामधील प्रमुख शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर 

पुण्यात राज ठाकरेंचा बॅनर वेधतोय सर्वांचे लक्ष...का वाचा सविस्तर 

Post a Comment

Previous Post Next Post