गुणरत्न सदावर्ते यांना आणखी एक झटका

। मुंबई । दि.20 एप्रिल । गुणरत्न सदावर्ते यांना आणखी एक झटका बसला आहे. न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यास परवानगी  दिली असून, कोल्हापूर पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. 

मराठा समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गिरगाव कोर्टाने कोल्हापूर पोलिसांना ताबा देण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिस आर्थर रोडकडे रवाना झाले आहेत.

मुंबई आणि सातारा पोलीस कोठडीतल्या मुक्कामानंतर आता वकील गुणरत्न सदावर्तेंचा पुढचा मुक्काम कोल्हापुरात आहे. कारण कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याचं पथक वकील गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झालंय.   

----------------

वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाडसाठी फ्रान्सला जाणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत : क्रीडामंत्री सुनील केदार

५८ कोटी रुपयांची बनावट उलाढाल दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एकास अटक

उष्णतेचा कडाका वाढल्याने पाणी टँकरच्या मागणीत वाढ 

Post a Comment

Previous Post Next Post