। अहमदनगर । दि.20 एप्रिल । उष्णतेचा कडाका वाढत ग्रामीण भागातून पाणी टँकर ला मागणी वाढू लागली असून, यंदा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदार संघाचा पासुनच पाणी टँकरला मागणी सुरू झाली आहे.
नगर जिल्ह्यात सर्वाधिक दोन पाणी टँकर संगमनेर तालुक्यात सुरू आहे. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात एक पाणी टँकर सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून उष्णतेचा कडाका पुन्हा वाढला आहे. गेल्या सलग दोन दिवसापासून शहराचे तापमान 42 अंशावर जात आहे.
उष्णतेची लाट आली असतानाच ग्रामीण भागातून पाणी टँकर ला मागणी वाढू लागली आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टँकर हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात सुरू झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारी भागातील दोन गावांमध्ये व नऊ वाड्या-वस्त्या वरील टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नगर जिल्ह्यात तीन हजार 893 नागरिकांना स्कॅन करणे पाणीपुरवठा केला जात आहे. पारनेर तालुक्यातील एक पाणी टँकर सुरू झाला आहे.
मे महिन्यात आणखी टँकर वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाच पाणी टँकर तर में महिन्यात 22 पाणी टँकर सुरू होते.
--------------
खालील बातम्या देखील वाचा...
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ३४ वा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न
सायबर सेल सक्रिय : तेढ निर्माण करणार्या पोष्ट कराल तर होणार कारवाई
महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख
Tags:
Ahmednagar
