खा.शरद पवार यांच्या शुभहस्ते ग्रंथालयांना पुस्तके वितरीत

खा.शरद पवार यांच्या शुभहस्ते ग्रंथालयांना पुस्तके वितरीत

आमदार विक्रम काळे यांच्या निधीमधून 3300 शाळांना पुस्तके भेट

। औरंगाबाद दि.26 एप्रिल ।  मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून औरंगाबाद विभागातील आठ  जिल्ह्यांतील तब्बल 3300 शाळांना रुपये 10 कोटी 31 लाख 25 हजार किमतीची 11 लाख 71 हजार 500 पुस्तके ग्रंथालयासाठी वितरित करण्यात आले.

आज हा पुस्तक वितरण सोहळा व मुख्याध्यापक कार्यशाळा पार पडली असून सदर पुस्तक वितरण सोहळा पद्मविभूषण मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते रुक्मिणी सभागृह, एम. जी. एम. विद्यापीठ परिसर, औरंगाबाद येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थित होतो.

याप्रसंगी लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एम.जी.एम. चे अध्यक्ष, माजी आ.कमलकिशोरजी कदम, सामाजिक न्याय मंत्री धनंजयजी मुंडे, बाबुरावजी कदम, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार अमरसिंह पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेस पार्टीचे जिल्हाअध्यक्ष आ. डॉ. कल्याण काळे, आमदार संजय दौंड, माजी आमदार  भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post