...अवैध शस्त्र विक्रीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागेल : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी

 मंत्री गडाख यांच्या संदर्भातील व्हायरल ऑडिओ क्लिपचा तपास तात्काळ करा : 

अवैध शस्त्र विक्रीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागेल : राजेंद्र दळवींचा खळबळजनक दावा
 
 
। अहमदनगर । दि.27 एप्रिल ।राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि त्यांचे पुत्र उदयन गडाख यांच्या हत्येच्या कटासंदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे. ती खरी का खोटी याची शहनिशा करतानाच पोलीस प्रशासनाने त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषणाचा संदर्भ घेऊन सध्या योग्य तपास केल्यास नेवासा सोनई परिसरातील तसेच नगर जिल्ह्यातील बेकायदा देशी विदेशी बनावटीच्या पिस्तूल विक्रीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागेल असा खळबळजनक दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. यासाठी त्यांनी पाटील यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 
 
यासंदर्भात जाधव व दळवी यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी सविस्तर चारचा करून त्यांना निवेदन दिले. मंत्री गडाख यांचे स्वीय सहाय्यकावर प्राणघातक गोळीबार झाला. आणि या हल्ल्याने नगर जिल्हा हादरला. त्यानंतर मंत्री गडाख आणि त्यांचे सुपुत्र उदयन गडाख  यांच्या हत्येची  सुपारी दिल्याची बातमी आली. सोबत या वृत्ताला दुजोरा म्हणून या सुपारीची चर्चा करणारी एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली. त्यात संबंधित संशयित आरोपी हा उघडपणे मंत्री गडाख यांच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली देत आहे. आणि २० इस्रायली बनावटीची २० अग्नी शस्त्रे विदेशी पिस्तूल जायच्याकडे आहेत अशा शार्प शूटरला सुपारी दिल्याचे उघडपणे सांगत आहे. 
 
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात एका कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला अशा प्रकार ऑडिओ क्लिप व्हायरल करून धमकावणे , त्यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्या हत्येची सुपारी देऊन त्यांच्यावर प्राणघातक गोळीबार होणे असे प्रकार उघडपणे सुरु आहेत. अशा घटनांमुळे नगर जिल्ह्यातील राजकीय नेते , प्रतिष्ठित मंडळी आणि सामान्य नागरिक यांच्यात घबराटीचे वातावरण आहे. या घटनांची दखल आपण महाराष्ट्राचा बिहार झाल्यानंतर घेणार आहात का ? 
जर आपणास या घटनेच्या मुळापर्यंत जायचे असेल तर या ऑडिओ क्लिप मधील संदर्भ घेऊन जिल्ह्यातील बनावट शस्त्र विक्रीचा तपास जरी सुरु केला
 
तरी युक्रेनला पुरवता येतील इतकी बेकायदेशीर गावठी आणि विदेशी बनावटीची पिस्तुले आपणास सापडतील तसेच नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी जगत ज्या बेकायदेशीर शस्त्र विक्रीच्या वर्तुळाशी जोडले गेले आहे त्याचा तपास आपण केला तर मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागेल आणि कायद्याची लक्तरे वेशीला टांगणाऱ्या गुन्हेगारी जगताचा पर्दाफाश होईल त्यामुळे पोलिसांनी या ऑडिओ क्लिप संदर्भात आर्म ऍक्ट चा आधार घेत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याचा तपास शीघ्र गतीने करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post