फॅमिली कोर्ट बार संघटना अध्यक्षपदी अ‍ॅड. कराळे

। अहमदनगर । दि.10 एप्रिल । अहमदनगर शहरातील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगरची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवाजी कराळे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेश लगड व सचिवपदी अ‍ॅड.अनिता दिघे तसेच सहसचिवपदी अ‍ॅड. अर्चना शेलोत, खजिनदारपदी अ‍ॅड. राजेश कावरे, सदस्यपदी अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड. मच्छिंद्र आंबेकर, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. शिवाजी सांगळे, अ‍ॅड. सुचिता बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांच्या हस्ते फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनमुळे कौटुंबिक न्यायदानाच्या प्रक्रियेत मदत होणार आहे. वकील, पक्षकार यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बार असोसिएशनची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

 नूतन अध्यक्ष अ‍ॅड. कराळे यांनी वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी बार असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अहमदनगर शहर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल सरोदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. वांढेकर, अ‍ॅड. निर्मला चौधरी, अ‍ॅड. सेलोत, अ‍ॅड. उजागरे, अ‍ॅड. राशीनकर उपस्थित होते.

-------------

खालील बातम्या देखील वाचा...

दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

कृषी सेवा केंद्र फोडून चोरट्यांनी रोकड पळवली  

नेप्ती उपबाजारात कांद्याला काय मिळाला भाव...वाचा सविस्तर

Post a Comment

Previous Post Next Post