अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 10 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 10 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

बुद्धीबळ खेळून बुद्धीला चालना देणे गरजेचे : वसंत
लोढा

। अहमदनगर । दि.10 एप्रिल ।अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 10 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन नागर महाजनवाडी जुना कापड बाजार येथे दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा यांनी बुद्धिबळ पटावर चाल चालून केले. 

यावेळी महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण सर, अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे, पंच देवेंद्र ढोकळे, देवेंद्र वैद्य, चेतन कड  आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होत

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 10 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 30 विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले. तर दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा म्हणाले की अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून 

खेळाडूंसाठी घेत असलेल्या या विविध स्पर्धेबद्दल कौतुक करून बुद्धिबळ खेळणे बुद्धीला चालना मिळते त्यामुळे बुद्धिबळ खेळ हे नेहमी खेळावे तसेच राजकारणात देखील बुद्धिबळ प्रमाणेच चाल चलावी लागती त्या मुळे युवकांनी मोठ्या प्रमाणावर बुद्धिबळ खेळ खेळण्याचे आवाहन देखील करण्यात आल.

महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण सर म्हणाले की बुद्धिबळ खेळामुळे अभ्यासात एकाग्रता वाढून बुद्धीला चालना मिळते विविध निर्णय घेण्याची क्षमता येते भविष्यात महानगर पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने महानगरपालिका अधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून 

शाळेत चेस इन स्कूल खेळाचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली. तसेच प्रास्ताविकात बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट म्हणाले की  अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने नागर महाजनवाडी जुना कापड बाजार  येथे बोर्डवर ही स्पर्धा घेण्यात आली. 

या स्पर्धेत 30 खेळाडूंनी सहभाग घेतला असून या स्पर्धेतून निवड झालेले 2 मुले व 2 मुली हे कोल्हापूर येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे. येत्या 22 एप्रिल ला बडी साजन मंगल कार्यालय आनंद ऋषीजी हॉस्पिटल शेजारी स्टेशन रोड येथे आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या स्पर्धेचे प्रायोजक शांतीकुमारजी मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट सर यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त पारूनाथ ढोकळे यांनी केले तर आभार खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post