दिव्यांगासाठी असणार्‍या निधीचे वाटप होत नसल्याने भाजप दिव्यांग विकास आघाडीचे दि.1मे रोजी उपोषण


। अहमदनगर । दि.22 एप्रिल ।  दिव्यांगासाठी असणार्‍या 5 टक्के निधीचे वाटप होत नसल्याने भारतीय जनता पक्ष, दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केला आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शासन निर्णय 2016 नुसार दिव्यांगासाठी असणारा 5 टक्के निधीबाबत दि.12 एप्रिल रोजी निवेदन सादर केले आहे. मात्र अद्यापही यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

लवकरात लवकर निर्णण झाला नाही तर दि.1मे रोजी जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साखळी उपोषण करणार असल्याचे वसंत शिंदे, आशाताई गायकवाड, विजय पडोळे, चंद्रकांत काळे, राम तुपे, श्रीकांत काळे, कैलास शेलार, सुरेश देवकर, अमोल कराळे यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post