। पुणे । दि.22 एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीत पार पडलेल्या सभेत खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला असून अमोल मिटकरांकडून माफीची मागणी ब्राह्मण समाजाकडून जोर धरत आहे. मात्र, अमोल मिटकरी माफी मागणार नसल्याच्या वक्तव्यावर ठाम आहेत.
अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तर राजकीय वर्तुळातून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, मी कुठल्याही समाजाविरोधात बोललो नाही. तसेच माझ्या वक्तव्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असून मी माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे. यावर आता स्वत: आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी कोणत्याही पक्षाबद्दल आणि जातीबद्दल बोललेलो नाही, ज्यांना वाटत असेल मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी मी माफी मागायला तयार आहे, असं मिटकरी म्हणाले आहेत. परिणामी मिटकरी यांनी माफी मागायला स्पष्ट नकारच दिल्याची चर्चा राज्यात रंगली आहे.
----------------
खालील बातम्या देखील वाचा...
जिल्हाधिकारी कार्यालयासाठी शहर बससेवा सुरू करा
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा करावा : कृषीमंत्री
