दारूच्या नशेत केला पत्नीचा खून ; गुन्हा दाखल

। अहमदनगर । दि.16 मार्च ।  जामखेड रोडवरील वैद्य कॉलनी येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल मारून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली.

गंगाधर नवनाथ लोंढे (वय ५७, रा.गणपती मंदिराजवळ, वैद्य कॉलनी, जामखेड रोड, ता. नगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. मंदा सुनील वैराळ असे मृत महिलेचे नाव आहे. मयत मंदा वैराळ यांचा पती सुनील हिरामण वैराळ याला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.

लोंढे यांच्या घराच्या वरील मजल्यावर सुनिल वैराळ आणि मंदा वैराळ त्यांच्या दोन मुली आणि एका मुलासह भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते. सोमवारी रात्री सव्वाअकराच्या दरम्यान आरोपी सुनिल याने घरगुती वादाच्या कारणातून मंदा यांच्या डोक्यात पाइपलाइनचा लोखंडी वॉल मारून खून केला.

घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सुनील याला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------

हे देखील वाचा...जलवाहिनी लिकेज झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत 

हे देखील वाचा...अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना

हे देखील वाचा...मोटारसायकली चोरणार्‍या तिघांना साडेतीन लाखाच्या मुद्देमालासह अटक 

Post a Comment

Previous Post Next Post