पोलिस बतावणी करुन दागिने पळविले


। अहमदनगर । दि.13 मार्च । पुढे भरदिवसा चोर्‍या होत असून तुम्ही सावध राहा, आम्ही पोलीस असून तुम्हाला सांगतो कि तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा, असे म्हणून अण्णासाहेब गोपीनाथ बेळगे (राहणार विजयनगर, पाथर्डी) यांच्याकडील 

12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कापडी पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून व पिशवीला गाठ मारून ती त्यांना सांभाळण्यास देऊन दागिने मात्र चोरून नेले. 

ही घटना पाथर्डी येथील मंगल कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी अण्णासाहेब बेळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार रोकडे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post