। अहमदनगर । दि.20 मार्च । नगर-पुणे महामार्गावरील अपघातात अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
नगर-पुणे नगर चास महामार्गावर शिवारात रिलायन्स पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याची ओळख पटविण्यासाठी नगर तालुका पोलिसांकडून विविध ठिकाणी चौकशी केली जात आहे.
रविवारी (दि. 13) रात्री साडेबारा वाजता हा अपघात झाला असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला काही नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस हवालदार जे. डी. जंबे करीत आहे.
पोलिस मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत आहे. या व्यक्तीचे वर्णन - चेहरा उभट, रंग सावळा, उंची 5 फुट 3 इंच, अंगाने सडपातळ, अंगात निळ्या कलरचा फुल शर्ट, काळ्या ग्रे कलरची पॅन्ट, हिरव्या कलरची अंडरविअर त्यावर विकी असा मार्क, डोक्याचे केस वाढलेले, दाढी खुरटलेली, मिशी वाढलेली, डावा डोळा निकामी (बारीक), डावा पाय बारीक व पोलिओ झाल्यासारखा आहे.
या एक व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास अगर त्याच्या नातेवाईकांबाबत काही माहिती असल्यास त्यांनी नगर तालुका पोलिस ठाणे (फोन नंबर 0241-2416122) यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.