चित्तथरारक कुस्त्यांनी गजबजले कापुरवाडी चे मैदान


। अहमदनगर । दि.19 मार्च ।  चित्तथरारक कुस्त्याचे डावपेज टाकत मल्लांनी हंगामा रंगतदार केला. चितपत कुस्त्यासाठी उपस्थित प्रेक्षकांनी बक्षिसांचा वर्षाव करत मल्लांना प्रोत्साहन दिले.
कापुरवाडी ( ता. नगर )कानीफनाथ देवाची येथे यात्रा भरते. दोन दिवस हि यात्रा भरते. पहिल्या दिवशी गावातून मिरवणुक काढण्यात येते . संध्याकाळी  छबीन्याची मिरवणुक फटाक्याची अतिषबाजी केली. 

दोन वर्ष कोरोना मुळे जत्रा भरल्या नाही. मात्र यंदा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी यात्रा कमिटीने  भव्य अशा हगाम्याचे आयोजन केले होते. दोन वर्षानी हंगामा भरल्यामुळे जिल्हयातील लहानपासून मोठया पर्यत मल्लांनी हगाम्याला हजेरी लावली आपली कला दाखविली.

 शंभर रुपायापासून ते पंचवीस हजार रुपाया पर्यत कुस्त्या लावल्या . या हगाम्यात अदीनाथ कासार ,साहेबराव मेजर, शिवाजी दुसुंगे, फक्कड कराळे दुर्गेश भगत यांनी पंच म्हणून काम पाहिले.हा हागामा पाहण्यासानी मा. आ. शिवाजी कर्डीले, उद्धव दुसुंगे, सरपंच संभाजी भगत, उपसरपंच  मारूती कचरे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत , अक्षय कर्डीले, जावेद शेख, सचीन तोडमल, संपत धाडगे, माणीक धनगर, मुन्नि शेख, पोपट कराळे, सदाशिव धामणे, नाना डोंगरे, कानीफनाथ कासार, अशोक भगत उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post