। मुंबई । दि.22 फेब्रुवारी । अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी ऍप, अंगणवाड्यांच्या भाडेपट्टीत वाढ, आहाराच्या दरात वाढ या मागण्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमधील अंगणवाडी कर्मचारी उद्यापासून तीन दिवस मुंबईतील आझाद मैदानावर ) तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनात मुंबई व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रोज 200 च्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनात कृती समितीचे सर्व प्रमुख नेतेही सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्याती आली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी याआधीही विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर उद्यापासून अंगणवाडी कर्मचारी तीव्र आंदोलन करणार असून या आंदोलनात आता पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन होत असले
तरी आता या कर्मचाऱ्यांनी जिल्हा पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचारी आता 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
Tags:
Breaking