। अहमदनगर । दि.25 जानेवारी । राहाता बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याच्या 6276 गोण्यांची आवक झाली आहे. यामध्ये प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त असा 2700 रुपये इतका भाव मिळाला आहे.
राहाता बाजार समितीत 6 हजार 276 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली आहे. यामध्ये कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे आहेत.
एक नंबर कांद्याला 2300 ते 2700 रुपये भाव मिळाला.
दोन नंबर कांद्याला 1450 ते 2250 रुपये भाव मिळाला आहे.
तीन नंबर उन्हाळी कांद्याला 500 ते 1400 रुपये भाव मिळाला.
तर
गोल्टी कांद्याला 1700 ते 1900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला आहे.
Tags:
Ahmednagar