डबा मारुन पत्नीचे डोके फोडले


। अहमदनगर । दि.15 जानेवारी । राहाता मार्केटच्या पाठीमागे राहणारा अंबादास बाबासाहेब लाड याने पत्नी सौ. काजल अंबादास लाड हिला सांगितले की, तू मला जेवायला वाढ. नवर्‍याने जेवण मागितल्याने पत्नीने त्याला जेवण वाढले. 

वाचा सविस्तर...कोरोना बाधितांच्या संसर्गचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला ; आज 225 रूग्णांना डिस्चार्ज  

जेवण वाढत असताना क्षुल्लक कारणावरून रागावून त्याने पत्नी काजल हिच्या डोक्यात त्याच्याजवळ असलेला स्टीलचा डबा मारून डोके फोडले, डोक्याला जखम होवून रक्त वाहिले. 

वाचा सविस्तर...हॉटेलचा नाष्टा करताना चोरट्यांनी डाव साधला ; पाच लाखाची बॅग लांबवली 

या प्रकरणी काजल लाड (रा. प्रवरानगर, सुपर मार्केट मागे, मूळ रा. येळे, ता. पाथर्डी) या महिलेच्या फिर्यादीवरून अंबादास लाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सय्यद करीत आहेत.

वाचा सविस्तर...‘मविआचा मराठी पाट्यांचा पुळका बेगडी’ : चित्रा वाघ 

Post a Comment

Previous Post Next Post